ओमायक्रॉनला हलक्यात घेऊ नका

नवी दिल्ली : जगभरात पसरलेला कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन हा डेल्टाच्या तुलनेत कमी धोकादायक असल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेड्रोस गेब्रेयसस यांनी मात्र ओमायक्रॉनमुळे संपूर्ण जगभरात मृत्यू होत असताना सौम्य म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करु नका, असा इशारा दिला आहे.


ट्रेड्रोस गेब्रेयसस यांनी कोरोनाचा नवा व्हेरियंट वेगाने संसर्ग फैलावत असून मोठ्या प्रमाणात लोकांना लागण होत असल्याचे सांगितले. ओमायक्रॉन केसेसची त्सुनामी इतकी मोठी आणि जलद आहे की जगभरातील आरोग्य यंत्रणांवरील बोझा वाढला आहे. गेल्या आठवड्यात जगभरात ९० लाख ५ हजार रुग्ण आढळल्याची नोंद जागतिक आरोग्य संघटनेकडे आहे. ही वाढ तब्बल ७१ टक्क्यांची आहे, असे ते म्हणाले.


“ओमायक्रॉन डेल्टाच्या तुलनेत आणि खासकरुन लसीकरण झालेल्यांमध्ये कमी गंभीर असल्याचे दिसून येत आहे, पण याचा अर्थ त्याला सौम्य म्हणून दुर्लक्षित करावे असा होत नाही,” असेही ट्रेड्रोस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.


“मागील अनेक व्हेरियंटप्रमाणे ओमायक्रॉनदेखील लोकांना रुग्णालयात दाखल होण्यास भाग पाडत असून मृत्यूसाठी जबाबदार ठरत आहे,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.


टेड्रोस यांनी श्रीमंत देशांकडून लसींचा जास्तीत जास्त साठा घेतला जात असल्याने नाराजी जाहीर केली असून किमान २०२२ मध्ये तरी लसींचे योग्य वाटप व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

इस्त्रायलचा गाझावर हल्ला, ६ ठार

गाझा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टीत शांतता नांदावी म्हणून गाझा पीस प्लॅनची घोषणा

सुदानमध्ये ७७ लाख लोक करतायत उपासमारीचा सामना, लाखो मुलांना कुपोषणाचा धोका

सुदान (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात गरीब देश दक्षिण सुदान सध्या भयंकर संकटाचा सामना करत आहेत. तेथे आलेल्या

'या' तारखेपासून विंडोज १०चा सपोर्ट होणार बंद

वॉशिंग्टन डीसी :  टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जगभरात मोठ्या

अमेरिकेच्या गाझा शांतता योजनेशी हमास सहमत

वॉशिंग्टन : पॅलेस्टिनी मिलिशिया गट हमासने अमेरिकेच्या गाझा शांतता प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. शांतता

सरकारी निधी थांबल्यामुळे नासातही शटडाऊन

वॉशिंग्टन : अमेरिकेते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर उच्च टॅरिफ लावले असताना, त्यांच्या

Munich Airport : हादरा! म्युनिक विमानतळावर अचानक '१७ रशियन ड्रोन'; तातडीने विमानसेवा बंद

म्युनिक : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध आता केवळ दोन देशांपर्यंत मर्यादित राहिलं नसून, त्यात जगातील अनेक