सीसीटीव्ही कॅमेरा आणि सर्व्हेलिअन्स यंत्रणेचे हस्तांतरण

मुंबई  : संकल्प सिद्धी ट्रस्ट, मुंबई या संस्थेच्या कार्यकारी अध्यक्ष आणि भाजप महाराष्ट्र सचिव दिव्या ढोले यांच्या संकल्पनेतून व माध्यमातून मुंबई पोलीस परिमंडळ ९ क्षेत्रातील वर्सोवा व ओशिवरा पोलीस स्थानकांतर्गत अति संवेदनशील ठिकाणांवर "सीसीटीव्ही कॅमेरे व सर्व्हेलिअन्स यंत्रणा" लावून कार्यान्वित करण्यात आली आहे. संस्थेकडून या सीसीटीव्ही कॅमेरा आणि सर्व्हेलिअन्स यंत्रणेचे अधिकृत हस्तांतरण मुंबई पोलीस परिमंडळ ९ चे उप आयुक्त मंजुनाथ शिंगे यांच्याकडे प्रकल्प दस्तावेज देऊन गुरूवारी ओशिवरा पोलीस स्थानक येथे करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला एसीपी सुनील बोंडे, वर्सोवा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिराज इनामदार, ओशिवरा पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनी साळुंखे, दोन्ही पोलीस स्थानकाचे दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी, वर्सोवा क्षेत्रात सामाजिक काम करणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश गिडवाणी, भारत शर्मा उपस्थित होते.

"आपला परिसर आपली जबाबदारी" हा प्रकल्प संकल्प सिद्धी ट्रस्ट मुंबई ही संस्था "सार्वजनिक सुरक्षितता आणि सुरक्षा" ह्या विषयाला अनुसरून सातत्याने  राबवत आहे. मुंबई शहरात २०१७-१८  मध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून अति संवेदनशील ठिकाणांवर साधारण ५००० सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. त्यानंतर सुमारे ५०००  कॅमेरे अजून बसवण्याचा प्रस्तावही होता.
Comments
Add Comment

'शक्ती'नंतर राणीबागेत 'रूद्र' वाघाचा मृत्यू! प्रशासनाच्या कारभारावर अनेक प्रश्न

मुंबई: मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातून आणखी एका वाघाच्या बाबतीत धक्कादायक घटना

महापालिकेच्या मुलांना आता चॉकलेटस्वरुपातील एनर्जी बार

पोषक आहारांतर्गत खिचडीसह या एनर्जी बार दिले जाणार मुलांना एनर्जी बारसाठी १४१ कोटी रुपये खर्च केले जाणार

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल