मुंबई : गोव्याहून मुंबईला आलेल्या कॉर्डेलिया क्रूझवरील ६६ प्रवासी कोरोना बाधित आढळल्यानंतर क्रूझवरील १,८२७ प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात आली. यात एकूण १३९ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वांना विविध रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
कॉर्डेलिया क्रूझ मंगळवारी, ४ जानेवारीला सायंकाळी ग्रीन गेट येथे आल्यानंतर त्यावरील ६० कोरोना बाधित रुग्णांना भायखळा येथील रीचर्डसन, सेंट जॉर्ज शासकिय रुग्णालय आणि क्रुडास जम्बो कोविड केंद्र आणि इतर विविध हॉटेल्समध्ये दाखल केले आहे.
त्यानंतर, जहाजावरील एकूण १ हजार ८२७ प्रवाशांची कोविड तपासणी करून, त्यांच्या स्वॅबचे नमुने २ वैद्यकीय प्रयोगशाळेमार्फत घेण्यात आले होते. यासाठी महानगरपालिकेच्या ए विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी व त्यांचे सहकारी, निमवैद्यकीय कर्मचारी, तंत्रज्ञ तसेच परिरक्षण खात्यातील अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कामगार अशी संपूर्ण यंत्रणा कार्यरत होती.
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…