Sunday, June 22, 2025

कॉर्डेलियावरील बाधितांचा आकडा १३९ वर

कॉर्डेलियावरील बाधितांचा आकडा १३९ वर

मुंबई  : गोव्याहून मुंबईला आलेल्या कॉर्डेलिया क्रूझवरील ६६ प्रवासी कोरोना बाधित आढळल्यानंतर क्रूझवरील १,८२७ प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात आली. यात एकूण १३९ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वांना विविध रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.



कॉर्डेलिया क्रूझ मंगळवारी, ४ जानेवारीला सायंकाळी ग्रीन गेट येथे आल्यानंतर त्यावरील ६० कोरोना बाधित रुग्णांना भायखळा येथील रीचर्डसन, सेंट जॉर्ज शासकिय रुग्णालय आणि क्रुडास जम्बो कोविड केंद्र आणि इतर विविध हॉटेल्समध्ये दाखल केले आहे.



त्यानंतर, जहाजावरील एकूण १ हजार ८२७ प्रवाशांची कोविड तपासणी करून, त्यांच्या स्वॅबचे नमुने २ वैद्यकीय प्रयोगशाळेमार्फत घेण्यात आले होते. यासाठी महानगरपालिकेच्या ए विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी व त्यांचे सहकारी, निमवैद्यकीय कर्मचारी, तंत्रज्ञ तसेच परिरक्षण खात्यातील अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कामगार अशी संपूर्ण यंत्रणा कार्यरत होती.

Comments
Add Comment