विलास खानोलकर
‘श्री साईनाथाय नमः, साईनाथ महाराज की जय’ असे म्हणून शिर्डीला येणारे अनेक भक्त साईचरणी दक्षिणा म्हणून फळे, फुले, शिधा, तांदूळ ठेवत असत. धोतर, शाली ठेवत असत, तर कधी रुपये-पैसेही ठेवत असत. साई स्वतःच्या हाताने गोरगरिबांना कपडा-फळे, धान्य वाटत असत व आशीर्वादही देत असत. जमा झालेल्या रुपयाचे ते निरनिराळ्या सुक्या लाकडाच्या मोळ्या विकत घेत असत व दिवस-रात्र न थांबणाऱ्या धुनीसाठी वापरत असत. त्या धुनीतून येणारी राख व उदी अनेकदा साई भक्तांच्या कपाळी लावीत असत व मंत्र म्हणून प्रसाद व उदी हातावर ठेवत असत. बाबांच्या आशीर्वादाची स्पंदने त्या उदीत सामावलेली असत. उदीचा भक्तजन आदराने स्वीकार करीत. मृत्यू हा देहाला नित्य व्यापूनच आहे. तो कधी चुकणार नाही. त्यानंतर देहाची राख किंवा मातीच होते. तीच आपली नामरूपाची अंतिम गती आहे. म्हणून वृथा देहाभिमान ठेवू नका. प्रत्येक क्षणी ईश्वरी नाम घेऊन परोपकाराने राहा. ही आठवण साईंची उदी करून देत असे. त्यामध्ये विवेकपूर्ण वैराग्य व सदा आरोग्य हा संदेश साई भक्तजनांना देत असत.
साई म्हणे नित्य मला भजा साई,
साई नामातच आहे बाबा-आई ।। १।।
प्रेम करा बंधू-भगिनी ताई,
गरिबांच्या मदतीत दडला साई ।। २।।
विश्वात रोगाच्या अनेक लाटा,
वाढविण्यात त्या दुष्कर्मीचा वाटा ।। ३।।
वैद्य नर्स पांडुरंग रोखतील वाटा,
मदत त्यांना रोगाला फाटा ।। ४।।
गंगा नर्मदा नामे दोनदा स्नान,
स्वच्छ ठेवा खान-पान ।। ५।।
नको मनात भीती-भीती,
माणुसकीने बांधा प्रेमाच्या भिंती ।। ६।।
एकमेकांच्या मदतीचे बांधा पूल,
अंगावर ठेवा सदा स्वच्छतेची झूल ।। ७।।
मन चांगले वाटीत गंगा,
पळून जाईल भूत नंगा ।। ८।।
ताजी चांगली खा अन्नधान्य फळे,
योगासने वाढवा उत्तम बळे ।। ९।।
भरपूर चाला हसा गाला।
पूजा हनुमान श्रीकृष्ण बाला ।। १०।।
दुधावरती जशी येते साई,
प्रेम करा आई, दादा, ताई, माई।। ११।।
ईश्वरी नामात आहे जादू,
महादेव सदाशिव प्रसन्न सदू ।। १२।।
प्रगती करताना पाहा उंच शिडी, अाध्यात्मिक प्रगतीत उच्च स्थानी शिर्डी ।। १३।।
प्रगत स्पर्धेत उंच मारताना उडी,
घराबाहेर जाण्याआधी लावा उदी ।। १४।।
सकाळ-संध्याकाळ घ्या साईनाम उदी,
संकट येणार नाही कधी ।। १५।।
श्रद्धा, सबुरी, प्रेम, आस्था,
ईष्ट-कष्ट अभ्यास नाश्ता।। १६।।
दिनरात मोठे स्वप्न, मोठे कष्ट,
प्रसन्न साई देई इष्ट ।। १७।।
दूर करा व्यसन, आळस, अनिद्रा,
हाती धरा साईनामाची जपमुद्रा ।। १८।।
साई म्हणे मी आहे सर्वत्र,
लावा साईनामाचे अत्तर ईत्र ।। १९।।
पळून जाईल अपकीर्तीचा दुर्गंध।
पसरवा साईनामाचा सुगंध ।। २०।।