मैदानाबाहेर विराट त्याच्या मृदू स्वभावासाठी ओळखला जातो. विराटच्या संगोपनात त्याची आई सरोज यांचा मोलाचा वाटा आहे. २००६ मध्ये विराटच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर सरोज यांनी विराटसह विकास आणि मुलगी भावना यांना लहानाचे मोठे केले.
विराट हा देशातील आणि जगातील सर्वात उत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. सोशल मीडियावर त्याचे फॅन फॉलोइंग मोठे आहे. विराटने सोशल मीडियावर काहीही पोस्ट केले तर चाहते त्यावर अनेक प्रतिक्रिया देतात.