मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वरळी, मुंबई या ठिकाणी विदेशी मद्याविरोधात कारवाई करून आरोपीस अटक केली. या प्रकरणात विदेशी मद्य पुरवणाऱ्या मुख्य सुत्रधारास अटक करण्यात आली असुन फरारी आरोपींचा तपास सुरू आहे.
या गुन्ह्यात ८.८०० ब.लीटर विदेशी मद्य (स्कॉच), एक मोबाईल, स्मार्ट वॉच, एक बॅग, एक दुचाकी सुझुकी बर्गमॅन स्ट्रीट असे एकूण ४ लाख ६२ हजार ६०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यात शेहजाद हसनेन कुरेशी आणि मोहम्मद दानिश मुश्ताक अहमद खान या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, मुंबई आयुक्त कांतीलाल उमाप, राज्य उत्पादन शुल्क, ठाणेचे विभागीय उप-आयुक्त, सुनिल चव्हाण, अंमलबजावणी व दक्षता संचालक उषा वर्मा तसेच मुंबई शहर अधीक्षक सी. बी. राजपूत, उप अधीक्षक पोकळे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.