Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीसुरतमध्ये टँकर गळती, विषारी वायूमुळे सहा मजुरांचा मृत्यू

सुरतमध्ये टँकर गळती, विषारी वायूमुळे सहा मजुरांचा मृत्यू

२० हून अधिक मजूर रुग्णालयात दाखल, आठ जण व्हेंटिलेटरवर

सुरत : गुजरातमधील सूरत शहरातील औद्योगित परिसरात केमिकलने भरलेल्या टँकरमधून रसायनाची गळती झाल्याने सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान २० हून अधिक मजुरांचा श्वास गुदमरल्याने त्यांना सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर सध्या यातील आठ जण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात औद्योगिक परिसरातील राजकमल चिकडी प्लॉट क्रमांक ३६२ च्या बाहेर केमिकलचा टँकर उभा होता. येथे जवळच एक नाला असल्याचे सांगण्यात येत आहे. पहाटेच्या सुमारास अज्ञात टँकरचालक त्या नाल्यात विषारी रसायन टाकत होता. त्या दरम्यान वायू गळती होऊन त्याचा हवेशी संपर्क झाला. त्या टॅंकरपासून अवघ्या १० मीटर अंतरावर हे मजूर झोपले होते. विषारी वायूमुळे त्या मजुरांचा श्वास गुदमरला. हा वायू इतका विषारी होता की, सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. गळती झालेल्या टँकरमध्ये जेरी केमिकल असल्याची माहिती मिळत आहे.

रुग्णालयाचे प्रभारी डॉ. ओंकार चौधरी यांनी सांगितले की, या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर २० जणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. दरम्यान विषारी वायू गळतीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. मात्र आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -