अमृतसर : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना आणि ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात आता एअर इंडियाच्या इटली-अमृतसर फ्लाइटमध्ये जवळपास १२५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती विमानतळ संचालक व्ही. के. सेठ यांनी दिली.
अमृतसरच्या श्री गुरु रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळावर इटलीहून निघालेले एअर इंडियाचे विमान उतरले. या विमानातील १२५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विमानात एकूण १८० होते. त्यांचे नमुने घेऊन ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
दुसरीकडे, अमृतसरचे पोलीस उपायुक्त गुरप्रीस सिंगही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राज्यसभेचे खासदार सुखदेव सिंग ढिंडसा, माजी मंत्री मनोरंजन कालिया, अमृतसर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गुरप्रीत सिंग खैहरा आणि महापालिकेचे आयुक्त संदीप रिषी, पतियाळाचे जिल्हाधिकारी संदीप हंस, एडीसी गुरप्रीत सिंग थिंद यांच्यासह अनेक प्रमुख अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…