जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये आज, बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानी नागरिक आहे. या दहशतवाद्यांकडून दोन एम-४ कार्बाइन आणि एक एके सीरीज रायफलसह गुन्हेगारी साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
या वर्षाच्या पाचव्या दिवसांतील ही चौथी चकमक आहे. अलीकडेच दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्ये सैन्याने ९ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
यासंदर्भात जम्मू-काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्तचर माहितीच्या आधारे, पोलीस आणि सुरक्षा दलाच्या पथकाने बुधवारी सकाळी जिल्ह्यातील चंदगाम गावात शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. दोन्ही बाजूंच्या चकमकीत एका पाकिस्तानीसह जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी मारले गेले.
जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा हे मोठे यश असल्याचे विजय कुमार यांनी सांगितले. दक्षिण काश्मीरमध्ये सोमवारपासूनची ही दुसरी चकमक आहे. कुलगाम जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या चकमकीत दोन स्थानिक दहशतवादी ठार झाले. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये कारवाई करण्याचे धाडस केले होते. याला सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा दलाच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला होता.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…