औरंगाबादमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

  75

औरंगाबाद :राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढलेल्या पत्रकानुसार, जिल्ह्यातील तहसील कार्यलाय, पंचायत समिती कार्यालय,आरोग्य कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच या कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य लिखित स्वरुपात देण्याच्या सूचना सुध्दा यावेळी देण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. शहरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी घेतला आहे. तसेच शहरप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळत आहे.
Comments
Add Comment

वाळत घातलेले कपडे काढताना लागला विजेचा धक्का, महिलेचा दुर्देवी मृत्यू

जळगाव : वाळत घातलेले कपडे काढत असताना विजेचा धक्का लागल्याने ७१ वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना

प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये महिलांचे नग्न फोटो, महिला आयोगाचा धक्कादायक खुलासा

पुणे : पुणे पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर छापा टाकून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे

अवयवदानात महाराष्ट्र देशात अव्वल!

मुंबई : अवयवदानाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असून, गेल्या वर्षी राज्यात १९८ ब्रेन-डेड दात्यांची नोंदणी

पुण्यात बोर्ड काढण्यावरून वाद , तरुणावर कोयत्याने वार; काँग्रेसच्या माजी नेत्यावर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे . कधी खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार , तर कधी कोयता गँग

नागपूर - पुणे वंदे भारत या दिवसापासून धावणार

नागपूर : नागपूर (अजनी) ते पुणे आणि पुणे ते नागपूर (अजनी) अशी वंदे भारत एक्सप्रेस रविवार १० ऑगस्ट २०२५ पासून धावणार

एसटी महामंडळाच्या राखी पौर्णिमेसाठी ४० जादा गाड्या कार्यरत

लाडक्या बहिणींसाठी ८, ९ आणि ११ ऑगस्ट रोजी बसची विशेष सेवा पेण(स्वप्नील पाटील) : आधीच लाडक्या बहिणींना एसटी