अकोला : अकोल्यातील रहिवाशी असलेले कालीचरण महाराज यांनी रायपूर येथे महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. त्या वरून त्यांच्यावर रायपूर येथे गुन्हा दाखल झाला होता. अकोल्यात ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करीत कालीचरण महाराज यांच्यावर सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले होते. अकोला पोलिसांनी या प्रकरणी 27 डिसेंबर 2021 रोजी रात्री उशिरा गुन्हा नोंद करून झिरोची कायमी करून सदर गुन्हा रायपूर पोलिसांकडे वर्ग केला आहे.
छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे हिंदु सभेच्या कार्यक्रमांमध्ये कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल अर्वाच्च भाषा वापरली होती. यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली होती. याप्रकरणी रायपुर पोलीस येथे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर अकोल्यातहि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सिटी कोतवाली पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती.
मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास मनाई केल्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्या आंदोलनाला झुकून पोलिसांनी या प्रकरणी 27 डिसेंबर 2021 रोजी रात्री उशिरा भादंवी कलम 294, 505 (2)नुसार गुन्हा दाखल केला. सदर प्रकरण गुन्हा दाखल करीत झिरोची कायमी करून सिटी कोतवाली पोलिसांनी हे प्रकरण रायपुर पोलीस ठाण्याकडे वर्ग केले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता रायपूर पोलीस करणार आहे.
दरम्यान कालीचरण महाराज यांच्यातर्फे वकिलाकडून अकोला न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. नंतर याप्रकरणी अटकपूर्वच्या अंतिम अर्जावर सुनावणी पार पडली. कालीचरण महाराज यांना अटक झाल्याने अटकपूर्व जामीन अर्ज वकिलांकडून परत घेण्यात आला असल्याचे समजते.
कालीचरण महाराज यांच्या विरोधात सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी झिरोची कायमी करून सदर प्रकरण हे रायपुर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. तसेच या संदर्भामध्ये न्यायालयातही कळविण्यात आले असल्याची माहिती सिटी कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांनी दिली आहे.
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…