ताज्या घडामोडी
सिंधूताईंच्या निधनानंतर तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट
January 5, 2022 03:18 PM
104
मुंबई : सिंधूताई सपकाळ यांच्या निधनानंतर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे.
तेजस्विनीची पोस्ट
'अनेक लोकांनी विचारलं तू अजून कसं काही लिहलं नाहीस? पोस्ट नाही केलीस ? पटकन जज करतो ना आपण त्यांच्या सोशल मीडियावरुन माणसाला? पण कुटुंबातल्या माणसांना घरातलं कुणी गेल्यावर सोशल मीडियावर पोस्ट करण्याची मनःस्थिति आणि वेळ खरंच असतो? माझीही काहीशी अशीच अवस्था झाली. ', असं तेजस्विनीनं पोस्टमध्ये लिहिले आहे.
तसंच तेजस्विनीने पोस्टमधून सांगितल्या माईंसोबतच्या आठवणी. पोस्टमध्ये तेजस्विनीने लिहिले, माई आणि मी रोज संपर्कात नव्हतो .पण तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊन जाते, की तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि ह्यात त्यांचा हातभार आहे ह्याचं त्यांना भान ही नसतं.
मी सिंधूताई सपकाळ या सिनेमानंतर काही वेळा त्यांना भेटण्याचा योग आला. कधीच कुणाला नावाने हाक न मारता "बाळा" म्हणणार्या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या. मला चित्रपट बघून कायम म्हणायच्या "मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस!'
महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज
July 3, 2025 12:07 PM
पुणे: पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये
मनोरंजनताज्या घडामोडी
July 3, 2025 10:39 AM
झी मराठीवरील एक दशक एका कार्यक्रमाने गाजवलं आणि तो कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ द्या'च पाहिलं पर्व. या
महाराष्ट्रताज्या घडामोडी
July 3, 2025 08:03 AM
मुंबई : महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर आता राज्यातील तृतीय पंथीयांनाही एसटीच्या प्रवासात
महामुंबईताज्या घडामोडी
July 3, 2025 07:00 AM
मुंबई (प्रतिनिधी) : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहायलातील (राणीची बाग)
देशताज्या घडामोडी
July 3, 2025 06:14 AM
नवी दिल्ली : केंद्र सरकारने १२ टक्के जीएसटी स्लॅबमधील वस्तूंचा ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये समावेश करण्याची तयारी
महाराष्ट्रताज्या घडामोडी
July 3, 2025 01:30 AM
शिर्डी : जगभरातील कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात चोरट्यांचा