लखनौ : काँग्रेसने उत्तर प्रदेशातील बरेली येथे मंगळवारी ‘महिला मॅरेथॉन’ आयोजित केले होते. यामध्ये चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचे व्हिडिओ समोर आले आहेत. कोरोनाच्या काळात इतकी गर्दी जमवल्याने काँग्रेसवर टीका देखील केली जात आहे.
काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी ‘लडकी हूं, लढ सकती हूं’ या अंतर्गत प्रचार केला. याबाबत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी स्वतः घोषणा केली होती. त्याचनिमित्त हे मॅरेथॉन आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये शेकडो मुली धावताना दिसत आहेत. मध्येच चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने विद्यार्थिनी खाली पडलेल्या दिसतात. तसेच ओमायक्रॉनमुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. तरीही याठिकाणी अनेकांच्या तोंडाला मास्क दिसले नाही.
या कार्यक्रमाचे आयोजन करणार्या काँग्रेस नेत्या आणि बरेलीच्या माजी महापौर सुप्रिया आरोन यांनी सांगितले की काळजी करण्यासारखे काही नाही. “हजारो लोकांचा जमाव वैष्णोदेवीलाही गेला होता. त्याचे काय? या शाळकरी मुली आहेत. त्यांना रॅलीमध्ये थोडा वेळ धावायचे होते. पण, कोणाला काही दुखापत झाली असेल तर मी काँग्रेसच्या वतीने माफी मागते, असे सुप्रिया आरोन म्हणाल्या
कोरोना नियमांचे पालन करून निवडणुका घ्यायच्या आहेत. तसेच राजकीय पक्षाने देखील प्रचार करताना कोरोना नियमांचे पालन करावे, असे बजावले आहे. पण, कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना राजकीय पक्ष लाखोंची गर्दी करत रॅली काढताना दिसत आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून जोरदार प्रचार केला जात आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…