Thursday, September 18, 2025

देशात खनिज सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काबिल संस्था

नवी दिल्ली : देशात खनिज सुरक्षा सुनिश्चित व्हावी आणि महत्वाच्या तसेच धोरणात्मक दृष्ट्या आवश्यक अशा क्षेत्रात भारताला खनिज संपत्तीच्या बाबत स्वयंपूर्ण होता यावे, यासाठी, खाण मंत्रालयाने खनिज बिदेश इंडिया लिमिटेड (KABIL)-काबिल या नावाने,एक संयुक्त व्हेंचर कंपनी सुरु केली आहे. नॅशनल अल्युमिनियम कंपनी (NALCO), हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL), मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन (MECL) या कंपन्या हा संयुक्त उद्यमात सहभागी आहेत.

काबिलचा मुख्य उद्देश महत्वाच्या आणि आवश्यक अशा लिथियम, कोबाल्ट यांसारख्या खनिजांचा देशविदेशात शोध घेऊन ती मिळवण्याचा प्रयत्न करणे, हा आहे. तसेच, ई-वाहतूक, अक्षय ऊर्जा, औषधे, एअरोस्पेस, हवाई वाहतूक अशा महत्वाच्या क्षेत्रात, अशा क्षेत्रात आवश्यक असलेल्या खनिजांची पूर्तता करत, आत्मनिर्भर भारताला अधिक बळ दिले जात आहे.

स्वतंत्र संशोधन करून आणि निवडीचे निकष ठरवून, परदेशात खनिज संपत्ती संपादनाच्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी स्त्रोत ठरू शकणाऱ्या देशांची यादी ठरवली जाते. आतापर्यंत, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, बोलिव्हिया आणि चिली यांसारख्या स्त्रोत देशांसोबत काबिलची चर्चा सुरु आहे, या देशांमध्ये भारताला आवश्यक असलेली खनिजे आहेत. प्राथमिक पातळीवर, संबंधित देशांचे दूतावास आणि तिथल्या सार्वजनिक संस्थांशी चर्चा करुन आवश्यक त्या माहितीची देवाणघेवाण केली जात आहे, जेणेकरुन, खनिज क्षेत्रांच्या बाबतीत गुंतवणूक करण्यासाठी योग्य ते निर्णय घेता येतील.

Comments
Add Comment