तिस-या लाटेत 80 लाख लोकांना संसर्गाची भीती

  100

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Corona) रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच आता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी तिसऱ्या लाटेत 80 लाख लोकांना कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली आहे.

राजेश टोपे म्हणाले, पहिल्या लाटेत वीस लाख लोकांना कोरोनाची लागण झाली. दुसऱ्या लाटेत 40  लाख लोक कोरोनाबाधित झाले, दुर्देवाने कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यात जवळपास 80 लाख लोक कोरोनाबाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी मनुष्यबळाची खूप गरज आहे. परंतु, सध्या केंद्राने फक्त आयसीयुसाठीच लागणाऱ्या मनुष्यबळाला मान्यता दिली आहे. कोवीड सेंटरसह इतर कामांसाठीही मुनषबळ उपलब्ध करून द्यावे.  त्याबरोबरच राष्ट्रीय आरोग्य अभियानाला ( NHM) केंद्राने परवानगी दिलेली नाही. केंद्राने याला मान्यता दिली पाहिजे. शिवाय NHM कडून या आधिची राहिलेली रक्कम देण्यात यावी."

"राज्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे औषधांची उपलब्धता खूप गरजेची बाब आहे. केंद्राकडे त्यासाठी मागणी केली आहे. केंद्राने लवकरात लवकर औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा. त्याबरोबरच लॉकडाऊन आणि कोरोनाचे निर्बंध देशभर कसे असावेत? याची केंद्राने एक नियमावली तयार करून द्यायला हवी. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासोबतही तिसऱ्या लाटेच्या आनुषंगाने अनेक मागण्या केल्या आहेत. लवकरच तेही आमच्या मागण्या मान्य करतील असेही राजेश टोपे यावेळी म्हणाले.
Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई