मुंबईतील रुग्णसंख्या वाढली

 मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या ही सातत्याने वाढतच आहे. राज्याची राजधानीमध्येही ही रुग्णसंख्या वेगाने वाढताना दिसत आहे. मुंबईत आज 10 हजार 860 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एकूण 654 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे 92 टक्क्यांवर पोहोचलं आहे. सोमवारच्या तुलनेत आज कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून तो चिंतेचा विषय आहे. 


मुंबईत आजपर्यंत एकूण 7 लाख 52 हजार 012 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात सध्या 47 हजार 476 सक्रिय रुग्णसंख्या आहे. रुग्णदर दुप्पट होण्याचा कालावधी घटला असून तो 110 दिवसांवर पोहोचला आहे. 


मुंबईत कोरोना रूग्णांचा 20 हजारांचा आकडा पार झाला तर राज्य सरकार आणि महापालिकेच्या नियमानुसार मुंबईत कडक निर्बंध लावावे लागतील असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.





Comments
Add Comment

दावोसमध्ये महाराष्ट्राने केले तब्बल ३० लाख कोटींचे गुंतवणूक करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; १८ देशांमधून राज्यात मोठी गुंतवणूक येणार मुंबई : स्वित्झर्लंडमधील

वायू गुणवत्ता मापन प्रणाली न बसणाऱ्या प्रकल्पांची बांधकामे थांबवली

तब्बल १०६ बांधकामांना बजावल्या स्टॉप वर्कची नोटीस मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या सर्व बांधकाम प्रकल्पांच्या

मुलुंड,भांडुपकरांना येत्या मंगळवार आणि बुधवारी करावी लागणार पाणीकपातीचा सामना

ठाणे शहरातील काही भागांचादेखील पाणीपुरवठा राहणार बंद मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुलुंड (पश्चिम) येथील २४००

Mumbai Mayor Salary : मुंबईच्या महापौरांचा पगार ऐकून बसेल धक्का...आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका तरी...आकडा वाचून थक्कचं व्हाल!

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर होताच राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Mumbai Mayor 2026 : तेजस्वी घोसाळकर की राजश्री शिरवाडकर? आरक्षण जाहीर होताच भाजपच्या 'या' महिला नगरसेविकांची नावे चर्चेत

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी मुंबई महानगरपालिका (BMC) आता पुन्हा एकदा महिला

मुंबई, पुण्यात महिलाराज : राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण जाहीर

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदासाठीची बहुप्रतिक्षित आरक्षण सोडत अखेर आज मंत्रालयात पार पडली.