मुंबई : देवमाणूस २ या मालिकेने प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. या मालिकेचं रंजक कथानक प्रेक्षकांची मन जिंकतंय. प्रेक्षकांचा या मालिकेला सुरुवातीपासूनच खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि नटवर हाच देवमाणूस आहे.
आता देवमाणूस परत आला आहे म्हटल्यावर तो नेहमीप्रमाणे आपल्या बोलघेवड्या स्वभावाने बायकांना आपल्या जाळ्यात ओढणार. अशातच त्याला एक सावज भेटलं आहे. गावात आलेल्या कॉट्रॅक्टरची बायको हिच्यावर नटवरची नजर पडली आहे. प्रोमो मध्ये या व्यक्तिरेखेचा चेहरा न दिसल्यामुळे सगळ्यांना उत्सुकता होती कि ही व्यक्तिरेखा नक्की कोण साकारणार आहे. आगामी भागात प्रेक्षकांना तो चेहरा पाहायला मिळणार आहे. ही भूमिका अभिनेत्री शिवानी घाडगे साकारतेय. शिवानी हिला प्रेक्षकांनी याआधी लगीर झालं जी या मालिकेत सुमन काकीच्या भूमिकेत पाहिलं होतं. आता या नव्या भूमिकेत शिवानीला पाहताना प्रेक्षकांना सुखद धक्का मिळणार आहे.
या नवीन भूमिकेबद्दल बोलताना शिवानी म्हणाली, “मी देवमाणूस २ मध्ये गावात आलेल्या कॉन्ट्रॅक्टरची बायको नीलमची भूमिका साकारतेय. याआधी मी लगीर झालं जी मध्ये सुमन काकीची भूमिका साकारली होती. नीलम ही भूमिका सुमनच्या अगदी विरुद्ध आहे. सुमन ही अगदी साधी भोळी आहे याउलट नीलम ही गावातील स्त्री आहे. डॉक्टर देवची नजर ज्या स्त्रीवर पडते त्यांचं काय होतं हे प्रेक्षकांनी पाहिलंच आहे. त्यामुळे आता निलमचं काय होणार? नीलम डॉक्टरच्या जाळ्यात अडकणार का? हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल.”
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…