Thursday, July 3, 2025

नववर्ष समर्थ स्वागत गीत

नववर्ष समर्थ स्वागत गीत

आले आले स्वामी नववर्ष आले, इंद्रधनुष्याचे रंग उधळीत आले ।।१।।
समर्थांचे स्वागतास रविराज आले, सात घोड्यांचा रथ घेऊन आले ।।२।।
स्वामींच्या स्वागतास रविकिरण आले, समर्थच जणू पृथ्वीवर आले ।।३।।
स्वामी समर्थ माझे आई, धाव पाव घ्यावा आई ।। ४।।
स्वामी समर्थ माझे बाबाआई, खरेखरे ते साईबाबा साई ।। ५।।
स्वामी समर्थ ताई-माई-आई, तेच माझे मुक्ताई बहिणाबाई ।। ६।।
अक्कलकोटच माझे माहेर आई, केव्हा भेटण्यास येऊ मी आई ।।७।।
स्वामींचा मठच वाटे आई, काशी, गया आणि वाई ।। ८।।
श्री गुरू स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ।। ९।।
तुम्ही दिलात जगण्याला अर्थ, सारे काम करतो मी नि:स्वार्थ ।। १०।।
गरिबांच्या सेवेत खरा अर्थ, अपंगांची सेवा हाच परमार्थ ।। ११।।
गरीब भुकेलेल्या अन्नदान, राष्ट्रासाठी देईन देहदान ।। १२।।
स्वामी म्हणती व्हा मोठे, गोमातेसाठी बांधा गोठे ।। १३।।
पराक्रमाने महाराष्ट्र करा मोठे, एकतेने राष्ट्र करा मोठे ।। १४।।
स्वामींसाठी गुलाबाचा ताटवा, सुगंध त्याचा सर्वांमनी पसरावा ।। १५।।
सप्तरंग, फुलाफुलांत बहरावा, देह स्वामीचरणी वहावा ।। १६।।
सुगंधात शरीराचा रोमरोम वहावा, आत्म्याने आपलाच देह पाहावा ।।१७।।
ओंकार स्वरूपात प्रवेश करावा, सारा देह सुगंधी-चंदन व्हावा ।।१८।।
चंद्राला टाटा करिती सहर्ष, रवी किरणांचा गुलाबी स्पर्श ।। १९।।
समर्थ म्हणती तुम्ही व्हा मोठे, स्वामी करतील तुम्हाला मोठे ।।२०।।
देशसेवेने राष्ट्र करा मोठे, मुलं-मुलींनो तुम्ही व्हा मोठे ।। २१।।
चला स्वामी आले नववर्ष, झाला साऱ्यांना आनंद हर्ष ।। २२।।
इमान जागृत ठेवा मातीशी, जागृत राहा भारत मातेशी ।। २३।।
सारे जग तुझ्या पाठीशी, भिऊ नको स्वामी तुझ्या पाठीशी ।।२४।


।। बोला स्वामी समर्थ महाराज की जय ।।


विलास खानोलकर

Comments
Add Comment