मुंबई : मुंबई जिल्हा बँकेच्या चार जागासांठी २ जानेवारीला मतदान घेण्यात आले. आज मतमोजणी प्रक्रिया पार पडली असून चार पैकी चार जागा भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या सहकार पॅनेलला मिळाल्या असून त्यांचा दणदणीत विजय झाला आहे.
मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी १७ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्या १७ जागा देखील प्रविण दरेकरांच्या सहकार पॅनेलला मिळाल्या आहेत. चार जागांवर निवडणूक घेण्यात आली असून मध्यवर्ती ग्राहक संस्था मतदार संघातून सहकार पॅनलचे विठ्ठलराव भोसले विजयी झाले सहकार पॅनेल मधील प्राथमिक ग्राहक संस्था मतदार संघातून पुरुषोत्तम दळवी, तर महिला सहकारी संस्था मतदार संघातून जयश्री पांचाळ विजयी झाल्या आहेत. तसेच सहकार पॅनेलमधीलच राखीव मतदार संघातून अनिल गजरे विजयी झाले आहेत. चारही जागांवर प्रविण दरेकर यांच्या पॅनेलनं दणदणीत विजय मिळविला आहे. २१ पैकी २१ जागांवर सहकार पॅनलचा विजय झाल्याने दरेकरांनी आनंद व्यक्त केला आहे.
दुर्दैवाने शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलाकर नाईक यांनी पक्षाचा आदेश ऐकला नाही. तसेच शाखा प्रमुखांनी देखील आदेश ऐकला नाही. दोन्ही ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवली पण विजय आमचाच झाला. कधी नव्हे एवढे अभूतपूर्व यश त्यांनी आमच्या सहकार पॅनलला दिले आहे. आमचे चार पैकी चार उमेदवार निवडून आले आहेत, असे दरेकर म्हणाले.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…