अभिनेता जॉन अब्राहम आणि पत्नी प्रियाला कोरोनाची लागण

मुंबई : ओमायक्रॉनचा नवीन व्हेरीयंट समोर आल्यापासून जगभरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींना कोरोनाने घेरल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाचा फटका बसला आहे. दरम्यान अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचाल या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. जॉनने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, त्याला आणि त्याच्या पत्नीला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.


जॉन अब्राहमने आपल्या इन्स्टाग्रामवर लिहिले, ‘तीन दिवसांपूर्वी मी एका व्यक्तिच्या संपर्कात आलो. ज्याबद्दल मला नंतर कळले की तो व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह होता. आता प्रिया आणि मलाही कोरोना झाला आहे आणि आम्हा दोघांना घरी क्वारंटाईन केले आहे. आम्ही कोणाच्याही संपर्कात नाही. आम्हा दोघांचेही लसीकरण करण्यात आले आहे. कोरोनाचे अतिशय सौम्य लक्षणे आहेत. तुम्ही सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. मास्क घालत राहा.


दरम्यान, बॉलीवूडमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सीमा खान, करीना कपूर खान, अर्जुन कपूर, रिया कपूर, नोरा फतेही, मृणाल ठाकूर कोरोनाचे बळी ठरले आहेत.

Comments
Add Comment

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मेट्रो २ ‘ब’च्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा कायम

मुंबई : मेट्रो २ ब मार्गिकेतील मंडाले ते डायमंड गार्डन टप्प्याच्या संचलनासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे