अंबरनाथ :
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हत्येच्या घटनेने अंबरनाथ शहरात खळबळ माजली असतानाच दुसऱ्याच दिवशी शहरात सामुहिक बलात्काराची घटना घडल्याचे वृत्त आहे. एका तरूणीवर तिच्या तीन मित्रांनीच बलात्कार केला असून या तीनही आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर भोगे यांनी दिली.
अंबरनाथ अतिरिक्त औद्योगिक परिसरात असलेल्या जीआयपी धरण परिसरात हा प्रकार घडला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती भोगे यांनी दिली. अंबरनाथच्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या शेजारी असणाऱ्या रेल्वेच्या ग्रेट इंडीयन पेनिनसुला धरणाच्या परिसरात रविवारी दुपारी ही तरुणी तीन मित्रांबरोबर फिरायला गेली होती. त्यावेळी त्यांनी तिच्यावर बलात्कार केला, अशी तक्रार याच तरूणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ तीन आरोपींना अटक केली. हे तीनही आरोपी २५ ते ३० वयोगटातील आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर सलग दुसऱ्या दिवशी अंबरनाथ शहरात खळबळ माजली आहे.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…