31 डिसेंबरला तळीरामांना मुंबई पोलिसांचा दणका

नवीन वर्षाच्या आगमनाची वाट पाहत असलेल्या प्रत्येकाच्याच आनंदावर निर्बंध लागले. मुंबईसह महाराष्ट्रात अचानक कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आणि त्यामुळे मुंबईसह राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले. या पार्श्वभूमीवर थर्टी फर्स्टसाठी कार्यक्रमांचं आयोजन न करणे, नाईट कर्फ्यू तसेच लोकांनी रस्त्यावर गर्दी करू नये कलम 144 लागू करण्यात आले.

सर्व निर्बंध लागू असतानाही थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी अनेक लोक घराबाहेर पडले पाहायला मिळाले. अशातच अनेक तळीरामांकडून वाहन चालवत वाहतूक नियमांची पायमल्लीही करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक नियमांतर्गत कारवाई व्हावी, यासाठी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री अनेक ठिकाणी नाकाबंदी केली होती. यावेळी मुंबईत पोलिसांकडून निर्बंधांची पायमल्ली करणाऱ्यांवर आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, शुक्रवारी म्हणजेच थर्टी फर्स्टच्या रात्री अनेक वाहने रस्त्यावर होती आणि प्रत्येकाला नाकाबंदीतून जावे लागले. यावेळी तपासादरम्यान पोलिसांनी 18 जणांविरुद्ध दारु पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी (Drink And Drive) रॅश ड्रायव्हिंगचे (Rash Driving) गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या 408 जणांवर, ट्रिपल सीट बाईक चालवल्याप्रकरणी 16 जणांवर, तर मोटार वाहन कायद्याप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 1 हजार 375 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Comments
Add Comment

दादर पश्चिमेला झाड कोसळलं, चारचाकी थोडक्यात बचावली

मुंबई: दादरच्या पश्चिम येथील पोर्तुगीज चर्च जवळील परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. दादरच्या अमर हिंद

काहीही झाले तरी मुंबई महापौर महायुतीचाच असणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. नेत्यांच्या

मुंबईत देवींच्या आगमन मिरवणुकांनी परिसर उजळले

मुंबई: शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी शहरात सर्वात पूज्य देवींच्या मूर्तींचे उत्साही स्वागत करण्यात आले.

मुंबई मेट्रो स्टेशनच्या खराब डिझाइनवर प्रवासी नाराज

मुंबई: मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पंख्यांची कमतरता असल्याबद्दल 'रेडिट'वरील एका पोस्टनंतर मुंबई मेट्रो

मदर डेअरीचे टेट्रा पॅक दूध आजपासून प्रति लिटर २ रुपयांनी स्वस्त

मुंबई: मदर डेअरीने आपल्या युएचटी दूधाच्या (टेट्रा पॅक) किमतींमध्ये २ रुपयांची कपात करण्याची घोषणा आज, मंगळवारी

मुंबई मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद, एमएमआरडीएचा निर्णय

मुंबई : चेंबूर–जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरील वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांच्या