आयटी टिनर्सचा आजचा शेवटचा दिवस, उरले फक्त काही तास

मुंबई : आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिले आहेत. आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी शेवटची तारीख आज म्हणजेच, 31 डिसेंबर आहे. 31 डिसेंबरनंतर आयकर विवरणपत्र  दाखल करणाऱ्यांना दंड भरावा लागणार आहे.

आयकर विवरणपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या आठवड्यात लाखो लोकांनी विवरणपत्र दाखल केले असल्याची माहिती आयकर विभागाने अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली आहे. आयकर विभागाच्या माहितीनुसार, 30 डिसेंबर 2021 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत 24.39 लाख आयकर विवरणपत्र दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी 29 डिसेंबर 2021 रोजी 23,24,253  आयकर विवरणपत्र दाखल करण्यात आले होते. 28 डिसेंबर 2021 रोजी 18,89,057 आयकर विवरणपत्र दाखल करण्यात आले आहे. याआधी 27 डिसेंबर रोजी 15.49 लाख आयकर विवरणपत्र दाखल झाले होते. तसेच आतापर्यंत एकूण 5.34 कोटी आयकर विवरणपत्र दाखल करण्यात आले आहेत.

https://twitter.com/IncomeTaxIndia/status/1476578861030674432
Comments
Add Comment

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

मुंबई मेट्रो स्टेशनवर आता तुमचा व्यवसाय सुरू करा! काय आहे ही योजना?

मुंबई: मुंबईतील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा मुंबई मेट्रोने (MMMOCl)

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतींसाठी लागू झाले हे बंधन

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच

पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी जॉय मिनी ट्रेन सुरू करणार

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत