Saturday, July 20, 2024
Homeअध्यात्मसाईंचा नववर्षाचा संदेश

साईंचा नववर्षाचा संदेश

विलास खानोलकर

शिर्डीमध्ये धरणीमाता आणि आकाशरूपी पित्याच्या मांडीवर साईबाबा प्रकट झाले. संताची कुठलीच जात नसते. दया आणि शांती, हाच संतांचा धर्म. साईबाबा दीनदयाळू, प्रेमाचा सागर आणि तारणहार म्हणून प्रकट झाले. सब का मालिक एक है। ही गोष्ट लोकांना समजावतील. साईबाबांचा मंत्र आहे, श्रद्धा आणि सबुरी. जो माणूस श्रद्धा आणि सबुरी ठेवतो, त्याला साई मदत करतो. भूतकाळ विसरून वर्तमानात जगण्याची कला त्यांनी शिकविली. अंतर्मनाची साद ऐकून ईश्वराचे ध्यान करावे. साधनापथ स्वीकारावा व भक्तीची धुनी मनात चेतवावी. ईश्वराला बाहेर न शोधता स्वत:च्या अंतर्मनात शोधा, तो तेथेच निवास करतो. जी व्यक्ती मन:पूर्वक साईभक्ती करतो, त्याची सर्व विघ्ने दूर होतात. सर्व दुःखांचा नाश होतो आणि सर्व सुख प्राप्त होते. जे साईवर विश्वास ठेवतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. साई म्हणतात, मी सत्य आहे. तो मला शरण येईल त्याची मी सर्व कामे करीन. मी भक्तांच्या इच्छित रूपात त्याला दर्शन देईन. सहाय्य घेण्यास जो येईल, जे मागेल ते देईन. जो तन, मन, धनाने माझी भक्ती करतो, जो माझा संदेश मानतो त्याचे कल्याणच होईल.

साई म्हणे आले नववर्ष, स्वागत करा आनंदे सहर्ष ।। १।। अति आनंदे जगाल तुम्ही १०० वर्षं, इतिहासावर नाव कोरा १००० वर्ष ।। २।। आयुष्यात ठेवा मोठे उद्दिष्ट, पाठलाग ध्येयाचा जे आहे इष्ट ।। ३।। उठा लवकर ब्रह्ममुहूर्तावर, पहाटे साईनाम घेऊन पूजा करा पहाटे ।। ४।। करा सूर्यनमस्कार रोज पहाटे, लोम, विलोम, भ्रामरी करा पहाटे ।। ५।। करा योगासने रोज पहाटे, एक तास तरी चाला पहाटे ।। ६।। लिंबू मध गरमपाणी घ्या, पहाटे तुळसी पाणी द्या व घ्या पहाटे ।। ७।। ओंकाराचा नाम जप करा पहाटे, थोरामोठ्यांना नमस्कार करा पहाटे ।। ८।। प्रत्येक काम करा सुंदर, झकास राहा हसतमुख नको भकास
।। ९।। करा इतरांचाही परिपूर्ण विकास, तुमचाही होईल परिपूर्ण विकास ।। १०।। कुटुंबीयांना करा दिवसरात्र मदत, लहान थोर अपंगाना करा पहिली मदत ।। ११।। उत्तमकामाची द्या सर्वांना शाबासकी, ईश्वरही देईल सर्वात मोठी शाबासकी
।। १२।। वरिष्ठांना द्या योग्य तो मान, गरीब कनिष्टांचाही ठेवा मान ।। १३।।
सदा तोंडात ठेवा खडीसाखर, इतरांसाठीही बांधा देवाचे मखर ।। १४।। यशस्वी उद्योगधंद्यासाठी पायाला चक्र, हाती घ्या पराक्रमाचे सुदर्शन चक्र ।। १५।। मोठ्या नावासाठी करा काम मोठे, पराक्रमाचे नेहमीच वाढवा गाठोडे
।। १६।। महिन्या-महिन्याचे ठरवा मोठे ध्येय, वर्षावर्षाचे पूर्ण होईल आपसूक ध्येय ।। १७।। साई म्हणे उत्तम तब्येतीसाठी पाने तुळस, थोडा थोडा प्यावा दुर्वांचाही रस ।।१८।। पित्तआम्लासाठी घ्यावे आम्लोवीन, झणझणीत तिखठ, तेलकट सोडा महाहीन ।। १९।। प्रेमाने हसत आनंदी राहाल,
तरच जगी सर्वसुखी व्हाल ।। २०।। हाच साईचा नवीन वर्षाचा संदेश पाठवा सर्व देशविदेश ।।२१।। व्हाल तुम्ही सदा सुखी नववर्षात व्हाल आनंदी सुखी ।।२२।।

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -