मुंबई :मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील महत्त्वाच्या रुग्णालयांपैकी एक असलेल्या नायर रुग्णालयामध्ये सुमारे १६०० परिचारिकांची (नर्स) कमतरता असल्याचे समोर आले आहे. यामुळे एवढे मनुष्यबळ कमी असल्याने सेवेत असलेल्या परिचरिकांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. सध्या कोरोनाची आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने या रुग्णालयात परिचारकांची तातडीने भरती करण्याची मागणी दी म्युनिसिपल युनियनने केली आहे.
महापालिकेने सध्या केवळ ६८८ पदे मंजूर केली आहेत. त्यामुळे प्रत्येक दोन परिचारिकांवर एकूण ५ परिचारिकांच्या कामाचा ताण पडत आहे. या रुग्णालयामध्ये १६४८ परिचारिकांची कमतरता भासत आहे. नायर रुग्णालयाप्रमाणेच केईएम, सायन, कूपर, शताब्दी, भाभा, राजावाडी आणि इतर रुग्णालयांमध्ये देखील तशीच अवस्था आहे. तर, गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईची लोकसंख्या दुपटीहून अधिक झाली आहे. परिणामी, रुग्णसंख्या सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मात्र यासाठी परिचारिकांची तेवढ्या प्रमाणात भरती करणे गरजेचे होते.
कामाचा जास्त ताण पडत असल्याने याचा विपरीत परिणाम परिचारिकांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर आणि ओघाने रुग्णसेवेवरही होत आहे. यामुळे नर्सिंग कौन्सिलच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार परिचारिकांची पदे निर्माण करावीत आणि तातडीने परिचारिकांची भरती करावी, अशी मागणी युनियनचे सरचिटणीस रामकांत बने यांनी केली आहे.

१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…
मुंबई : पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. यात तीन डोंबिवलीकर,…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…
नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…