मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा लवकरच सुरू होणार असून मुंबईचा सलामीचा सामना १३ जानेवारीला रंगणार आहे. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी मुंबईचे नेतृत्व धडाकेबाज सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ कडे सोपवण्यात आले आहे.
४१ वेळा रणजी विजेत्या मुंबईचा एलिट क-गटात समावेश आहे. मुंबईचा सलामीचा सामना १३ जानेवारीला महाराष्ट्राशी रंगणार आहे,
तर दुसरी लढत २० जानेवारीपासून दिल्लीशी आहे. मुंबईच्या संघात अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज आदित्य तरेसह सलामीवीर यशस्वी जैस्वाल, मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खान, अरमान जाफर, आकर्शित गोमेल आणि अष्टपैलू शिवम दुबे यांनी स्थान मिळवले आहे.
अनुभवी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीसह मोहित अवस्थी, शाम्स मुलानी, शशांक अत्तार्डे, रॉयस्टन डायस आणि अर्जुन तेंडुलकर यांच्यावर मुंबईच्या गोलंदाजीची मदार असेल.
मुंबईचा संघ : पृथ्वी शॉ (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, आकर्शित गोमेल, अरमान जाफर, सरफराज खान, सचिन यादव, आदित्य तरे (यष्टिरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टिरक्षक), शिवम दुबे, अमन खान, शाम्स मुलान, तनुष कोटियन , प्रशांत सोलंकी, शशांक अत्तार्डे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, प्रिन्स बदियानी, सिद्धार्थ राऊत, रॉयस्टन डायस, अर्जुन तेंडुलकर.