मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस देऊन साक्षीसाठी बोलावले हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे ही नोटीस पाठविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवले आहे का? असा सवाल करत, ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला साक्षीसाठी पोलीस ठाण्यात बोलावता येत नाही, त्यांची साक्ष घरी जाऊन घ्यावी लागते, हे नोटीस देणारे पोलीस जाणीवपूर्वक विसरले आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. फडणवीस यांनी ही माहिती ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे.
फडणवीस म्हणाले, सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसतेय. राणेंना सीआरपीसी १६० ची नोटीस देणारे पोलीस जाणीवपूर्वक विसरलेत की, ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलावताच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस देऊन ठाण्यात साक्षीसाठी बोलावणे हा कायदेशीर अपराध आहे. म्हणून आता ज्या अधिकाऱ्याने हे केलेय, त्याच्यावर आयपीसी १६६ए अंतर्गत एफआयआर नोंदवला जावा, अशी आमची मागणी आहे.
दरम्यान असे न केल्यास भाजप सीआरपीसी १५६(३) अंतर्गत खटला दाखल करेल, तसेच हे जर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने करण्यात आले असेल, तर त्यांना सुद्धा आयपीसी ३४ अन्वये सहआरोपी बनविण्यात यावे, अशीही आपण मागणी करू, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…