दोन गाड्यांचा अपघात ; 4 जखमी

नवीन पनवेल :पनवेलजवळील कळंबोली-पुणे हायवे रोडवर अमेठी युनिव्हर्सिटीच्या समोरच एका फोर्ड इंडिव्हर गाडीच्या चालकाने त्याच्या पुढे चाललेल्या वॅगेनार गाडीस जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात त्या गाडीतील ४ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.



रोनित धर (२९, रा. ठाणे) त्याच्या ताब्यातील फोर्ड इंडिव्हर गाडी क्र. एमएच-43-एआर-0001 घेवून मुंबई ते पुणे जाणाऱ्या एक्सप्रेसवरून चालला असताना त्याने त्याच्या पुढे चाललेल्या व्हॅगेनर गाडी क्र. एमएच-14-जीयू-1797 हीला पाठीमागून जोरदारपणे धडक दिली. या झालेल्या अपघातात गाडीतील लालमोहम्मद रुकमोद्दीन शेख (३५), सुकाराम पुरकाराम चौधरी (४५), बन्सी बहादूर गौतम (४२) व इदरील रहमत चौधरी (४४, सर्व रा. पुणे) हे जखमी झाले असून त्यांना नजिकच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

महापालिकेत भाजपकडून छेडा,सिंह,कर्पे, दळवी, तर शिवसेनेकडून ब्रीद, सुर्वे यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत दहा स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार असून या दहा जागांसाठी

रोमानिया – मिलिसाऊटी शहराच्या महापौरांनी घेतली मुंबईच्या महापौरांची सदिच्छा भेट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रोमानिया – मिलिसाऊटी शहराच्या महापौर वांगले कॅमेरे यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती

'गाडगेबाबांचा जीवन संदेश आचरणात आणण्याची गरज'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गाडगे महाराजांनी आयुष्यभर सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा, गोरगरीब रुग्णांची सेवा,

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेतील रस्त्यांची गुणवत्ता तपासणार

खडी मुरमाच्या दबाईसाठी कोर कटिंग बंधनकारक! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली नवीन

टीएमएस २ .०  मुळे राज्यात जबाबदार आणि पारदर्शक आरोग्य व्यवस्था निर्माण होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टीएमएस २ .०  (ट्रांन्झॅक्शन मॅनेजमेंट सिस्टिम) प्रणालीचा आज शुभारंभ मुंबई : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य

बदलापूर बीजांड विक्री रॅकेट प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल

महिलांच्या अस्मितेशी खेळणाऱ्या माफियांना पायबंद घाला; IVF-सरोगसी प्रक्रियेवर कडक नियंत्रणाची मागणी- डॉ.