बदलापूर बीजांड विक्री रॅकेट प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल

महिलांच्या अस्मितेशी खेळणाऱ्या माफियांना पायबंद घाला; IVF-सरोगसी प्रक्रियेवर कडक नियंत्रणाची मागणी- डॉ. गोऱ्हे


मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बदलापूर येथे उघडकीस आलेल्या महिलांच्या बीजांड (Oocytes) विक्री रॅकेट प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना निवेदन दिले आहे.


बदलापूर येथील जोवेली परिसरात पोलीस कारवाईदरम्यान आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या महिलांना लक्ष्य करून त्यांच्या शरीरातून कृत्रिमरीत्या बीजांड काढून त्यांची बेकायदेशीर विक्री करणारे संघटित रॅकेट उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेला मानवी तस्करीचा आणि महिलांच्या प्रजनन अधिकारांवरील गंभीर आघाताचा स्वरूप असल्याचे त्यांनी नमूद केले.


डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, यापूर्वीही त्यांनी विधानपरिषदेत सरोगसी प्रक्रियेतील महिलांच्या शारीरिक शोषणाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. तसेच महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी चंद्रशेखर धर्माधिकारी समितीने दिलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची मागणी सातत्याने केली होती. बदलापूरमधील घटना ही त्या शिफारशींच्या उल्लंघनाचे उदाहरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


प्राथमिक तपासानुसार या रॅकेटचे धागेदोरे नाशिक, नागपूर तसेच तेलंगणा आणि बंगळुरू पर्यंत पसरले असल्याची माहिती समोर येत आहे. सुमारे ३०० हून अधिक महिलांचे शोषण झाले असून काही मोठी रुग्णालये आणि डॉक्टरांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


स्त्री आधार केंद्र च्या माध्यमातून महिलांच्या हक्कांसाठी काम करताना अशा प्रकारच्या घटनांविरोधात कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या निवेदनाद्वारे डॉ. गोऱ्हे यांनी या गुन्ह्याच्या आंतरराज्यीय स्वरूपाचा विचार करून तातडीने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी केली आहे.


तसेच संबंधित रुग्णालयांचे परवाने रद्द करणे, दोषी डॉक्टरांवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करणे, धर्माधिकारी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे आणि बीजांड दान व सरोगसी प्रक्रियेवर कडक मानक कार्यपद्धती (SOP) तयार करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. महिलांच्या आरोग्याशी आणि अस्मितेशी खेळणाऱ्या अशा माफियांवर शासनाने कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि