नाशिक : नाशिकमधून देशात व परदेशात इंडिगो एअर लाइन्सतर्फे विमान सेवा सुरू करण्यात यावी, या विषयावर महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पद्मश्री बाबुभाई राठी सभागृहात इंडिगो एअरलाइन्सचे मॅनेजर सेल्स गौरव जाजू व मॅनेजर कार्पोरेट सेल्स शशांक लठू यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली.
इंडिगो एअरलाइन्सचे मॅनेजर सेल्स गौरव जाजू व मॅनेजर कार्पोरेट सेल्स शशांक लठू यांनी नाशिकमधून विमानसेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. सुरुवातीला महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी स्वागत केले व महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची माहिती दिली. तसेच नाशिकमधून इंडिगोने देशात व विमानसेवा सुरू करावी. विमानसेवा सुरू करण्यासाठी सर्व सुविधा व पोषक वातावरण आहे. इंडिगोला चांगला प्रतिसाद मिळेल, असे सांगितले.
इंडिगो लवकच नाशिकमधून विविध शहरात विमानसेवा सुरू करेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रसंगी सुनीता फाल्गुने, संजय जयनवणे, संजय राठी, दत्ता भालेराव, मनिष रावल, व्हिनस वाणी, रवी जैन, राजाराम सांगळे, सहायक सचिव अविनाश पाठक उपस्थित होते.
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…