Thursday, July 18, 2024
Homeदेशनौदलाच्या पश्चिम ताफ्याचे नवे प्रमुख रिअर ऍडमिरल समीर सक्सेना

नौदलाच्या पश्चिम ताफ्याचे नवे प्रमुख रिअर ऍडमिरल समीर सक्सेना

मुंबई : भारतीय नौदलाचा ‘स्वोर्ड आर्म’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम ताफ्याचे नवे प्रमुख नियुक्त झाले आहेत. रिअर ऍडमिरल अजय कोच्चर, नौसेना मेडल (एनएम) यांनी या ताफ्याची धुरा रिअर ऍडमिरल समीर सक्सेना, नौसेना मेडल (एनएम) यांच्याकडे सोमवारी सोपवली.

रिअर ऍडमिरल सक्सेना यांची 1 जुलै 1989 रोजी भारतीय नौदलात नियुक्ती झाली आहे. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, वेलिंग्टनचे डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेज आणि नेव्हल वॉर कॉलेज, न्यूपोर्ट, यूएसए या संस्थांचे ते माजी विद्यार्थी आहेत. नेव्हीगेशन आणि डायरेक्शन विशेषज्ञ असलेल्या सक्सेना यांनी आयएनएस विराटवर डायरेक्शन टीमचे सदस्य म्हणून, आयएनएस कुठार, गोदावरी आणि दिल्ली या युद्धनौकांचे नेव्हिगेटिंग ऑफिसर म्हणून काम पाहिले आहे. आयएनस मुंबईवर कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्याचबरोबर गार्डियन ही मॉरिशियन तटरक्षक दलाची नौका आणि आयएनएस कुलिश आणि मैसूर यांची धुरा सांभाळली आहे.

वेस्टर्न फ्लीटचे फ्लीट ऑपरेशन्स ऑफिसर म्हणूनही त्यांनी काम केले होते. एनडीए आणि सेंटर फॉर लीडरशीप अँड बिहेवियरल स्टडीजमध्ये त्यांनी प्रशिक्षणविषयक नियुक्तीचे काम केले आहे. त्यांनी नौदलप्रमुखांचे नौदल सहाय्यक म्हणून कार्मिक संचालनालयात, प्रिंसिपल डायरेक्टर ऑफ फॉरिन कोऑपरेशन, आयएचक्यू एमओडी(एन) येथे काम पाहिले आहे. ते लंडन येथील भारतीय उच्चायुक्त कार्यालयात नौदल सल्लागार म्हणूनही कार्यरत होते. 5 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांनी फ्लॅग रँकमध्ये पदोन्नतीवर नौदलप्रमुखांचे सहाय्यक म्हणून पदभार स्वीकारला.
रिअर ऍडमिरल कोच्चर, एनएम नवी दिल्ली येथे एटीव्हीपी मध्ये प्रकल्प संचालक (परिचालन आणि प्रशिक्षण) म्हणून नियुक्त झाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -