भारताचा 327 धावांवर पहिला डाव आटोपला

भारत- दक्षिण आफ्रिका (India vs Sout Africa) यांच्यात सेंच्युरियनमध्ये (Centurion) सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील (First Test Match) दुसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळं रद्द करण्यात आला. त्यामुळे तिसऱ्या दिवशी कसं वातावरण असेल आणि खेळ होईल का? याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. अखेर खेळ सुरु झाला, पण भारतीय फलंदाज मात्र तिसऱ्या दिवशी खास कामगिरी करु शकले नाहीत. 3 बाद 272 धावांवर सुरु झालेला खेळ बघता बघता भारताने 7 विकेट गमावल्याने 327 वर सर्वबाद अशी झाली. ज्यामुळे भारताचा पहिला डाव 327 धावांवर आटोपला आहे.

भारताकडून सर्वाधिक धावा केएल राहुलने (KL Rahul) केली. त्याने अप्रतिम शतक झळकावत 123 धावा केल्या. तर मयांक अगरवालने 60 धावा केल्या. या दोघांनंतर अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) एका चिवट खेळीचं दर्शन घडवलं असून त्याने 102 चेंडूत 48 धावा केल्या आहेत. पण त्यानंतरचे सर्व फलंदाज बुमराह सोडता दुहेरी संख्याही गाठू शकले नाही. बुमराहने केवळ 14 धावा केल्या. तर ऋषभ पंत आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 8 धावा केल्या आहेत. तर आश्विन, ठाकूर आणि सिराज यांनी 4 धावा केल्या. त्यामुळे भारताचा डाव लवकरच आटोपला.
Comments
Add Comment

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट

भारतीय महिला हॉकीला सापडला नवा ‘हिरा’

प्रशिक्षिका हेलिना मेरीकडून बन्सुरी सोलंकीचे कौतुक नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकीच्या भविष्यातील सुरक्षित

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या