एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांचा हल्ला

जळगाव:  जळगाव जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवळकर यांच्या चारचाकी वाहनावर अज्ञात इसमांनी दगडफेक केली असल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यानंतर जळगावातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.


रोहिणी खडसे या चांगदेव येथून एका हळदी समारंभ कार्यक्रम नंतर मुक्ताईनगरकडे येत असताना सूतगिरणी परिसरात दोन मोटार सायकलवर आलेल्या चार अज्ञातांनी दगडफेक केली.  या दगडफेकीनंतर त्यांनी  रॉडने रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला केला. यावेळी वाहन चालकाने कार रस्त्यावरून बाजूला नेत रोहिणी खडसे यांच्यासह शेतात पलायन केले. त्यामुळे रोहिणी खडसे आणि चालक सुखरूप बचावले असल्याची माहिती खडसे कुटुंबीयांकडून देण्यात आली. हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील आठवड्यापासून रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्याविरोधात आवाज उठविला असल्याने त्यातून हा हल्ला झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

पुण्याच्या आरुषची गगनभरारी, १० व्या वर्षी अवकाशाला गवसणी

पुणे : हल्लीची मुलं ही मुळातच हुशार असतात. लहानग्या वयातच त्यांचा पंखात असणारं बळ हे प्रचंड असतं. थोडक्यात काय तर

Kolhapur Accident : ब्रेकिंग! कोल्हापूरच्या शाहू मिल चौकात भरधाव क्रेटाने दुचाकीला चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहू मिल चौकात (Kolhapur Accident)

जुन्नरमधील शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या लहानग्यांच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला मदतीचा हात

इनामदार कुटुंबाला शिवसेनेकडून पाच लाखांची मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉल करून केले मृत

Ladki Bahin Yojana e-KYC: बहिणींसाठी आनंदवार्ता! 'या' दिवसापर्यंत आता करता येणार ई-केवायसी

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता ज्या लाडक्या

Mumbai Mayor : मुंबईच्या महापौरपदाचा उमेदवार आज ठरणार!

महापौर आणि उपमहापौरपदासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईचा महापौर कोण याबाबत

ZP and Panchayat Samiti Elections 2026 : राज्यातील १२ जिल्हा परिषदांसह पंचायत समितीसाठी ७,४३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात…

मुंबई : गेल्या काही काळापासून राज्यात सुरू असलेला निवडणुकांचा धडाका आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. लोकसभा,