सरकारची आता 'कॉकटेल लस'

मुंबई : पंतप्रधान मोदींनी 10 जानेवारीपासून भारतात बुस्टर डोस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तेव्हापासूनच बुस्टर डोसबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. बुस्टर डोस किती दिला जाणार? कोणत्या लसीचा दिला जाणार? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना 10 जानेवारीपासून प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. पण लस देताना सरकार एक खास प्लान राबवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एखाद्या व्यक्तीला लसीचे पहिले दोन डोस एका वॅक्सिनचे देण्यात आले असतील तर तिसरा म्हणजेच, बुस्टर डोस त्याच वॅक्सिनचा देण्यात येणार नाही. तो दुसऱ्या वॅक्सिनचा देण्यात येणार आहे किंवा त्यासाठी कॉकटेल लशीच्या पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे.

10 जानेवारीपासून भारतात बुस्टर डोस, अर्थात कोरोना प्रतिबंधक लशीच्या तिसऱ्या डोसचं वितरण सुरु होणार आहे. मात्र तुम्ही ज्या लशीचे दोन डोस घेतले आहेत. तीच लस बुस्टर डोस म्हणून दिली जाण्याची शक्यता कमी आहे. कारण बूस्टर डोससाठी केंद्र सरकारकडून कॉकटेल लशीच्या पर्यायाची चाचपणी केली जात आहे. कॉकटेल अर्थात दोन वेगवेगळ्या लशींचे डोस अधिक परिणामकारक असल्याचं एका अभ्यासानंतर समोर आलं आहे. या संदर्भातील अहवाल अजून प्रसिद्ध व्हायचा आहे.

मीडिया वृत्तानुसार "जर एखाद्या व्यक्तीला त्यानं आधी घेतलेल्याच लसीचा बुस्टर डोस दिला तर तो तेवढा परिणामकारक ठरत नाही. पण कॉकटेल अर्थात दोन वेगवेगळ्या लशींचे डोस अधिक परिणामकारक असल्याचं अभ्यासात दिसून आलं आहे" जर सरकारनं डोस मिक्सिंगला परवानगी दिली, तर सीरम इन्स्टिट्यूटचे कोवोव्हॅक्स (नोव्हावॅक्सचा भारतीय ब्रँडचं नाव) हे पूर्वी कोविशील्ड मिळालेल्या लोकांसाठी बूस्टर डोससाठी वापरलं जाऊ शकतं.
Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.