Thursday, October 10, 2024
Homeताज्या घडामोडीआमिर खानने फातिमा सना शेखसोबत तिसरे लग्न केल्याचे फोटो व्हायरल, जाणून घ्या...

आमिर खानने फातिमा सना शेखसोबत तिसरे लग्न केल्याचे फोटो व्हायरल, जाणून घ्या व्हायरल फोटो मागचे सत्य

मुंबई : किरण रावपासून घटस्फोट घेतल्यानंतर आमिर खान हा फातिमा सना शेखसोबत तिसऱ्यांदा लग्न करत असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असा दावाही केला जात आहे की, आमिर खान त्याचा आगामी चित्रपट लाल सिंग चड्ढा प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या लग्नाची घोषणा करेल, मात्र यादरम्यान, आमिर आणि फातिमाच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असून आमिर आणि फातिमाचे लग्न झाल्याचा दावा केला जात आहे. किरण राव आणि आमिर खान यांच्या घटस्फोटानंतर फातिमालाही खूप ट्रोल करण्यात आले होते.

फेसबुकवर व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये आमिर आणि फातिमाच्या फोटोसह लिहिले आहे की, फातिमा शेख ही तीच अभिनेत्री आहे जिने दंगल चित्रपटात आमिर खानच्या मुलीची भूमिका केली होती. या चित्रपटात फातिमाने गीता फोगटची भूमिका साकारली होती. आज आमिर खानची तिसरी बेगम बनली आहे. ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. पण सत्यमेव जयतेचा प्रचार करणारा तोच आमिर खान बहुपत्नीत्वावरही बोलणार का? असा सवाल सुद्धा करण्यात आला आहे.

या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, हे आमिर खान शिवाय कुणालाच माहीत नाही. व्हायरल फोटोमध्ये छेडछाड करण्यात आली आहे. मूळ फोटोमध्ये आमिर किरण रावसोबत उभा आहे. साहजिकच किरणचा चेहरा बदलून त्याठिकाणी फातिमाचा चेहरा एडिट करून लावला आहे आणि हा फोटो आकाश अंबानीच्या एंगेजमेंटचा आहे. त्यावेळी आमिरचा किरणशी घटस्फोट झाला नव्हता आणि दोघेही एकत्र एंगेजमेंटला पोहोचले होते.

याबाबत आमिर आणि फातिमा यांनी अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. मात्र आमिरच्या जवळच्या मित्रांचे म्हणणे आहे की हे सर्व खोटं आहे आणि वेळ आल्यावर आमिरही या सर्वांची उत्तरे देईल.

दरम्यान, फातिमा आणि आमिरने दंगल आणि ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तेव्हा पासून ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. ‘लाल सिंग चड्ढा’ हा टॉम हँक्सच्या ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर खान, मोना सिंग आणि नागा चैतन्यही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -