विलास खानोलकर
साईबाबांसारख्या महान संतांचा सहवास लाभणे हे एक भाग्यच आहे. साईबाबांचा सहवास लाभलेल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींचा हा थोडक्यात परिचय. चांद पाटील : यांना बाबांनी अलौकिक सामर्थ्याने अग्नी व पाणी निर्माण करून चिलीम पेटवून दिली. त्यांची हरवलेली घोडी सापडून दिली. म्हाळसापती : यांना बाबांनी खंडोबाच्या देवळात प्रथम दर्शंन दिले. ‘आओ साई’! म्हणून त्यांचे स्वागत केले. बाबांबरोबर मशिदीत ते झोपत असत.
माधवराव देशपांडे : म्हणजे बाबांचा लाडका श्यामा. बाबांनी त्यांना शिक्षकाची नोकरी सोडावयास लावून जनसेवेचे व्रत दिले. विष्णुसहस्त्रनामाची पोथी दिली. तात्या कोते : यांना साईबाबा मामा म्हणत असत. छोट्या तात्याला स्वतःबरोबर झोपायची परवानगी दिली. त्यांच्याकडून मशिदीचा जीर्णोद्धार करून घेतला. त्यांच्या मस्तकी जरीचा शिरपेच बांधला. त्यांची आई बायजाबाई ही दिवसरात्र साईबाबांना जेवण, दूध, प्रसाद आईच्या मायेने देत असे. काकासाहेब दीक्षित : ही बाबांच्या सहवासातील एक महत्त्वपूर्ण व्यक्ती होती. दीक्षित हे नाव अमर राहावे म्हणून बाबांनी त्यांच्याकडून सुंदर वाडा बांधून घेतला. तोच दीक्षितवाडा नावाने सुप्रसिद्ध आहे. संतकवी दासगणू महाराज : यांना बाबांनी पोलीस दलातील नोकरी सोडायला लावली. त्यांच्याकडून संतचरित्र लिहून घेतली आणि नारदीय पद्धतीने कीर्तन करावयास प्रवृत्त केले. गोविंदराव दाभोलकर यांना हेमांडपंत ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. श्री साईचरित हा ग्रंथ लिहून घेतला. काकासाहेब महाजनी : बाबांनी यांना रामनवमी उत्सवाची प्रेरणा दिली. बापूसाहेब बुट्टी : नागपूरचे कोट्यधीश माणूस असूनही त्यांच्याकडून सुंदर वाडा बांधला. साईने तेथेच आनंदाने समाधी घेतली.
साई म्हणे मी भक्तीचा भुकेला
हृदयात प्रेमाचाच भाव भुकेला ।। १।।
दास गणू महाराज करी साई भजन
जगप्रसिद्ध करूनी बाबांचे कीर्तन
।। ७।।
चांद पाटलांची मिळविली घोडी
आयुष्यभर आठवण थोडी थोडी ।।२।।
गोविंदराव दाभोलकर झाले हेमांडपंत
सुप्रसिद्ध साईचरित्र
लिहून साईसंत ।। ८।।
बोलवे ‘आओ साई’ म्हाळसापती
दिवसरात्र साथ
भक्तांचा अधिपती ।। ३।।
काकासाहेब दीक्षितने
बांधला दीक्षितवाडा
साई चालवितो साऱ्या
संसाराचा गाडा ।। ९।।
सर्पदंशापासून वाचविले देशपांडे
माझाच शामा
माधवराव देशपांडे ।। ४।।
बापूसाहेब बुट्टीने बांधला बंगला
समाधीत साईचा
देह सुखे निजला ।। १०।।
तात्याकोते पाटीलला दिला शिरपेच
वाचविले संकटातून सोडविले सारेपेच।। ५।।
साई आठवण येते दिवसभर
भक्त माझे पसरले भारतभर ।। ११।।
बाईजाबाई हाती खाल्ली चपाती भाकर
आई, साई आयुष्यभर
तुझा नोकर ।। ६।।
सेवा करून झाली नररत्ने
अशी साईबाबांची ‘नवरत्ने’ ।।१२।।