
मुंबई : अभिनेत्री सनी लिओनीच्या ‘मधुबन’ गाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. सनी लिओनीचे ‘मधुबन’ हे गाणे काल यूट्यूबवर प्रदर्शित झाले आहे. मात्र, गाण्याला प्रेक्षकांकडून विरोध केला जात आहे.
''मधुबन'' या गाण्यातून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप सनीवर केला जात आहे. यामुळे या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. तसेच हे गाणे यूट्यूबवरुन हटविण्याची मागणीही काही यूजर्सकडून करण्यात आली आहे. ‘मधुबन’ हे गाणे कनिका कपूरने गायिले आहे. तर, शरीब आणि तौशी यांनी हे गाणे कम्पोज केले आहे.