इगतपुरी: मुंबईतील लग्नांमध्ये दागिन्यांची चोरी करणाऱ्या तीन आरोपींना इगतपुरी पोलिसांनी अटक केली असून अन्य एक आरोपी फरार झाला आहे. मुंबईतील केपटाऊन व्हिलाज येथे ७ डिसेंबरला लग्न सोहळा सुरू असताना नवरीचे दागिने असलेली बॅग काही अज्ञात चोरांनी लंपास केल्याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याबाबत ताराचंद केवलचंद बबेरवाल (रा. घोटी) यांनी फिर्याद दाखल केली होती.
इगतपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे व पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे यांनी तातडीने शोध पथक नेमून महाराष्ट्र पोलीस व्हॉटस ॲप ग्रुपच्या आधारे चोरांचा शोध सुरू केला. परिसरातील फोटो शुटींगच्या आधारे तपास सुरू केला असता आरोपी व त्यांचे मोबाईल नंबर मिळविण्यात आले. तपासाची चक्र वेगाने फिरवत असताना संबंधित आरोपी मुंबई जवळच्या मिरा – भाईंदर परीसरात असल्याचे मोबाईल लोकेशन आढळले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे यांनी काशिमीरा पोलीसांची या तपासकामी मदत घेत घटनेतील आरोपींना केवळ ४८ तासांत ताब्यात घेतले. तीन आरोपी हाती लागले असून त्यापैकी अन्य एकाने पळ काढला. तिघा आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. पोलीसांनी आरोपीना इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना २४ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी दिली.
सुमारे ६ लाख ११ हजार रूपये किंमतीचे चोरी झालेल्या दागिन्यांपैकी पैकी ५ लाख ६० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडे सापडला. या घटनेतील आरोपी अतिश अमर सिसोदिया, (२० , रा. जिल्हा राजगड, मध्यप्रदेश), निखिल रवी सिसोदिया, (१९ रा. पिपलीया, मध्यप्रदेश), करण महावीर सिंग, (२३ , रा. जिल्हा आग्रा, उत्तरप्रदेश) तर चौथा आरोपी विकास सालकराम सिसोदिया हा फरार असून पोलीस शोध घेत आहे. इगतपुरी पोलीसांनी केवळ महाराष्ट्र पोलीस व्हॉटस ॲप ग्रुपच्या आधारे अट्टल गुन्हेगारांचा शोध ४८ तासांत लावल्याने इगतपुरी पोलीसांचे अभिनंदन होत आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…