Thursday, July 18, 2024
Homeदेशदेशात ओमायक्रॉनचा धोका वाढला

देशात ओमायक्रॉनचा धोका वाढला

दिल्लीत पुन्हा निर्बंध; न्यू ईयर पार्टी, नाताळ सेलिब्रेशनवर बंदी

नवी दिल्ली: देशात करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळेच पुन्हा कठोर निर्बंध लागण्याची शक्यता असतानाच दिल्ली सरकारने आज मोठे पाऊल उचलत नाताळ सेलिब्रेशन तसेच न्यू ईयर पार्टी व अन्य सर्वच कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबतचा आदेश आज जारी केला आहे. दिल्लीत ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यातच केंद्र सरकारने सर्वच राज्यांना मंगळवारी पत्र पाठवून सतर्क केलं आहे व आवश्यकतेनुसार निर्बंध लावण्याची सूचना केली आहे.

त्या पार्श्वभूमीवर डीडीएमएने आज एक आदेश जारी करत दिल्लीत गर्दी होईल अशा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना मनाई केली आहे.
दरम्यान, देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचे २१३ रुग्ण आढळले असून त्यात एकट्या दिल्लीत ५७ रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी दिल्लीतील करोना बाधितांचा आकडाही वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीत करोनाचे आणखी १२५ रुग्ण आढळले आहेत तर ५८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आज दिल्लीत करोनाने एकही रुग्ण दगावला नाही. सध्या दिल्लीत करोनाचे ६२४ सक्रिय रुग्ण आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -