कोरोना काळात आरोग्य भरती आवश्यक होती

मुंबई: कोरोना काळात आरोग्य भरती आवश्यक होती, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.
'मला या ठिकाणी फार स्पष्टपणे सांगायाचं आहे की, कोरोना काळात आरोग्य विभागाच्या सर्व भरती होणं हे राज्याच्या जनतेच्या दृष्टिकोनातून आवश्यक होतं. कॅबिनेटने जाणीवपूर्व निर्णय घेतला की यामध्ये १०० टक्के जागा भराव्यात. त्यामुळे मी मंत्री म्हणून सभागृहाला एवढचं सांगेन की, माझा हेतू एवढाच आहे की या सगळ्या जागा भराव्यात, त्या अत्यंत पारदर्शक पद्धतीने भराव्यात यामध्ये कुठल्याही मुलावर कधीच दोष येता कामा नये. हीच आमची नैतिकता आणि नीतीमत्ता आहे, असे आरोग्य विभागीतील पद भरतीच्या मुद्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली.



“ गट ड संवर्गातील पदांच्या भरतीबाबत ज्या काही गोष्टी घडल्या, त्या खरोखर नैतिकतेला नीतीमत्तेला कुठेही धरून नाहीत. खरं कलियुग आहे हे या ठिकाणी सिद्ध होण्याचा प्रकार झालेला आहे. आपण म्हणतो जसं कुंपणच शेत खातं, त्या चुका या पद्धतीमध्ये आहेत, त्या पद्धती दुरूस्त करण्याची तयारी निश्चितपणे आहे. परंतु, आरोग्यमंत्री म्हणून माझा हेतू हा स्पष्टपणे मला सभागृहला सांगायचा आहे की, जनतेच्या हितासाठी जागा भराव्यात हा दृष्टीकोन मंत्र्याचा असणं चूक नाही. जी कार्यपद्धती आहे परीक्षा घेण्याची किंवा देण्याची ती कार्यपद्धती अवलंबून ती परीक्षा लवकर आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करणं यामध्ये गैर नाही. यामध्ये जे दोषी असतील, जे दोषी आज देखील पोलिसांना आढळलेले आहेत. तपास सुरू आहे, त्यांना पोलिसांनी जो दोष सांगितलेला आहे. जे जे लोक दोषी असतील त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करायला कुठलीही अडचण नाही. आरोग्य विभाग आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं की, जे कुणी दोषी असतील त्यापैकी कोणालाही पाठीशी घालण्याचं काम महाविकास आघाडीचं सरकार करणार नाही.” असंही यावेळी टोपेंनी बोलून दाखवलं.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

मासिक पाळी दरम्यान रजा योग्य की अयोग्य?

राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान

कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीबाबत न्यायालयात सक्षम बाजू मांडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व