भिवंडी (वार्ताहर): भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेने परीसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून नराधम पित्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात पोक्सोसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक केली असून त्यास न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीची प्रकृती बिघडल्याने वडिलांनी स्वतः मुलीला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली असता सदर मुलगी आठ आठवड्यांची गर्भवती असल्याची माहिती डॉक्टरांनी मुलीच्या वडिलांना दिली. त्यानंतर पीडित मुलीला व तिच्या वडिलांना डॉक्टरांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात नेले असता संबंधित माहिती उघड झाली.
त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या आईला पोलीस ठाण्यात बोलावून मुलीला विश्वासात घेऊन मुलीची विचारपूस केली असता वडिलांनीच आपल्यावर अत्याचार केला असल्याची माहिती पीडित मुलीने पोलिसांना दिली. त्यांनतर पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नराधम बापाला अटक केली.
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…