मुंबई : मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. बोल्ड आणि ग्लॅमरस अमृता खानविलकर तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. नुकतंच तिचे एक हॉट फोटो शूट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतंय. काळ्या रंगाच्या हॉट वेस्टर्न आऊटफिटमध्ये तिने हे फोटो शूट केलं. हा फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करताच तिच्या फॅन्सनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका फॅनने अमृता विचारले की, हॉलिवूड सिनेमा मिळाला का?
अमृताचा बोल्डनेस हे काही पहिल्यांदाच समोर आलेलं नाही . या आधीदेखील तिने असं बिनधास्त फोटो शूट करून फॅन्सला सरप्राईज केलं आहे.