शिक्षकांनी स्वयं मूल्यांकन देखील करावे

मुंबई : शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून अध्ययन केवळ विद्यार्थ्यांनीच करावे असे नसून शिक्षकांनी देखील सातत्याने अध्ययन करून अद्ययावत राहिले पाहिजे.  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांनी स्वयं मूल्यांकन देखील केले पाहिजे.  त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता विकास साधला जाईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी केले.  कांदिवली येथील ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंगळवारी 'नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण' या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी राज्यपाल बोलत होते.



कार्यक्रमाला ठाकूर महाविद्यालयाचे सचिव जितेंद्र सिंह ठाकूर, कोषाध्यक्ष राजकुमार सिंह, विश्वस्त रमेश सिंह, प्राचार्या डॉ. चैताली चक्रवर्ती, उपप्राचार्य निशिकांत झा, विशेष निमंत्रक प्राचार्या डॉ. शोभना वासुदेवन व डॉ. ए एम पुराणिक तसेच प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिक्षणाशी निगडित सर्व गटांशी व्यापक विचार विमर्श करून तयार करण्यात आले असून या धोरणात विद्यार्थ्यांना सुरुवातीची काही वर्षे मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर दिला आहे, असे सांगताना जपान किंवा चीन या देशात आरंभीचे शिक्षण मातृभाषेतच दिले जाते याकडे राज्यपालांनी लक्ष वेधले.

Comments
Add Comment

काँग्रेसचे ठरले, वंचित बहुजन आघाडीला सोडणार ६०पेक्षा अधिक जागा?

यंदा महापालिकेत वंचितचे खाते उघडण्याची दाट शक्यता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी

माहिममध्ये दोन जागांवर बोळवण, मनसे उबाठावर नाराज

माहिम विधानसभा उबाठा आणि मनसेची ठरणार डोकेदुखी कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी सूर उमटवायला सुरुवात

प्रशिक्षणाला अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंदवण्यावर निवडणूक विभाग ठाम

जे कर्मचारी गैरहजर असतील त्यांची नावे त्वरित कळवण्याचे केले आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी)

‘ए मेरे वतन के लोगो’ आणि रोहित शर्मा; भावूक करणारा व्हिडिओ चर्चेत

मुंबई : रोहित शर्मा केवळ मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही आपलं देशप्रेम वेळोवेळी व्यक्त करताना दिसतो. पुन्हा

मुंबई महापालिका क्षेत्रात १ लाख ६८ हजार दुबार मतदार

मुंबई : मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांच्या छाननीत अखेर एक लाख ६८ हजार ३५०

पुण्यात महाविकास आघाडीत फूट, आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार

पुणे : पुण्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होताच तासाभरात महाविकास आघाडी फूटली आहे. आम आदमी पक्षाने (आप)