
मुंबई: कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेने संप मागे घेतल्याची घोषणा अजयकुमार गुजर यांनी आज पत्रकार परिषदेत केली आणि एकप्रकारे राज्य सरकारकडून एसटी संपात फूट पाडल्याचं दिसून आलं आहे.
गेले 54 दिवस सुरु असलेला एसटीचा कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत होते आणि आज अखेर संपातचा तिढा सोडवण्याएवजी राज्य सरकार या संपात आणि एसटी कर्मचारी यांच्यामध्ये एकप्रकारे फूट पाडत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
कनिष्ठ वेतन श्रेणीतील कर्मचारी या संपातून माघार घेत असल्याचं गुजर यांनी सांगताच अनेक एसटी कर्मचा-यांची घोर निराशा झाली आहे. इतके दिवस सुरू असलेला हा लढा आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे. अनेक कर्मचा-यांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केलीय. गुजर यांनी घेतलेला हा निर्णय मान्य नसल्याचं अनेक एसटी कर्मचारी बोलत आहेत..