'ब्लॅक मंडे' : कोरोनाचा तडाख्याने बाजार कोसळला!

मुंबई : भांडवली बाजाराला आज पुन्हा एकदा कोरोनाचा तडाखा बसल्याचे दिसून आले. ओमायक्रॉनचा फैलाव आणि पुन्हा लॉकडाऊनचे संकट याने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी चौफेर विक्री केली. या धामधुमीत सेन्सेक्स तब्बल १००० अंकांनी कोसळला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३०० अंकांनी आपटला. या पडझडीने काही मिनिटांत तीन लाख कोटींचा चुराडा झाला. सकाळ सकाळ जोरदार झटका देणारा आज दिवस गुंतवणूकदारांसाठी 'ब्लॅक मंडे' ठरला.


भारतासह जगभरात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढ करण्याचे धाडसी निर्णय घेतले. यामुळे द्विधा मनस्थिती झालेल्या गुंतवणूकदारांनी आज बाजारातून पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला. युकेमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे.आज सोमवारी बाजार उघडताच चौफेर विक्री झाली. सध्या सेन्सेक्स १०२९ अंकांनी कोसळला आहे.


सेन्सेक्स ५६ हजार अंकांनी खाली घसरला असून तो ५५९८२ अंकावर आहे. निफ्टी ३११ अंकांनी कोसळला असून तो १६६७३ अंकावर ट्रेड करत आहे. याआधी शुक्रवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स ८८९ अंकांच्या घसरणीसह ५७०११ अंकावर स्थिरावला. निफ्टी २६३ अंकांच्या घसरणीसह १६९८५ अंकावर बंद झाला होता.


आजच्या सत्रात सेन्सेक्सवरील ३० पैकी केवळ ४ शेअर तेजीत आहेत तर २६ शेअरमध्ये घसरण झाली आहे. ज्यात इन्फोसिस, नेस्ले, डॉ. रेड्डी लॅब, सन फार्मा, एचसीएल टेक, एचयूएल, टेक महिंद्रा, एनटीपीसी, रिलायन्स, एसबीआय, एचसीएफसी बँक, बजाज फायनान्स या शेअरमध्ये मोठी पडझड झाली आहे.


निफ्टी मंचावरील सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात आज घसरण झाली आहे. दरम्यान, भारतीय स्पर्धा आयोगाने अॅमेझॉनचे २०१९ मध्ये फ्युचर ग्रुपशी केलेला करार रद्द केला आहे. तसेच आयोगाला प्रस्ताव मंजूर करण्यासाठी चुकीची माहिती सादर केल्याबाबत अॅमेझॉनला २०० कोटींचा दंड ठोठावला. याचे पडसाद आज भांडवली बाजारात उमटले. आज फ्युचर समूहाचे शेअर तेजी दिसून आली. फ्युचर ग्रुपच्या काही शेअरमध्ये जवळपास २० टक्के वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो प्रवासातील

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात