मुंबई : मध्य रेल्वेने लोकल प्रवाशांसाठी नव्या वर्षाची भेट आणली असून, जानेवारी २०२२ पासून लोकलमध्ये प्रवाशांना आता वायफायची सुविधा मिळणार आहे. मुंबईतील एकूण १६५ लोकलमधील तब्बल ३ हजार ४६५ डब्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे. आतापर्यंत प्रवाशांना केवळ रेल्वे स्थानकांमध्येच वायफायची सुविधा मिळत होती. मात्र, आता थेट प्रवासादरम्यान डब्यातही वायफाय मिळणार आहे.
लोकलमधील सर्वच प्रवाशांना वायफायचा सहज वापर करता यावा यासाठी वायफायसाठी सक्षम यंत्रणा बसवण्यात येणार आहे. लोकलमध्ये गर्दी झाल्यानंतरही वायफायची रेंज सर्व प्रवाशांना मिळावी यासाठी तयारी करण्यात येत आहे. खरे तर लोकलमध्ये प्रवाशांनी प्रवास सुरू केल्यानंतर त्यांच्या मोबाईलची रेंज निघून जाते. त्यांना मोबाईलवर बोलणेही शक्य होत नाही. असे होऊ नये यासाठी रेल्वेने आता लोकलमध्ये उच्च क्षमतेचा वायफाय राऊटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
हा प्रकल्प पूर्वीच येणे अपेक्षित होता. मात्र तो काही कारणास्तव रखडला होता. आता मात्र नव्या वर्षात तो पूर्ण करण्यात येत आहे. मध्य रेल्वे हे काम एका खासगी कंपनीकडून करून घेणार आहे. लोकलच्या प्रत्येक डब्यात वायफाय लावले जात आहे. ही उच्च क्षमतेची वायफाय सुविधा मोफत असेल का, याबाबत अद्याप रेल्वेने स्पष्ट केलेले नाही. रेल्वेची उत्पादन क्षमता वाढावी, यासाठी रेल्वे प्रशासनाने नवनवे उपक्रम सुरू केले आहेत. याअंतर्गत लोकलच्या डब्यांमधील वायफाय सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची ट्विटर पोस्ट चर्चेत नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी…
सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…
मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…