Sunday, October 26, 2025
Happy Diwali

उत्तर भारतात हुडहुडी, महाराष्ट्राचा पारा घसरणार

उत्तर भारतात हुडहुडी, महाराष्ट्राचा पारा घसरणार
मुंबई : उत्तर भारतात थंडी़ची लाट आलीय. त्यामुळं येत्या काही दिवसांत महाराष्ट्रामध्येही तापमानाचा पारा तीन ते चार अंशांनी घसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये आधीच तापमान शून्याच्या खाली पोहोचलंय. शिमल्यामध्ये तर काल उणे दोन अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. गुजरात राज्यांमध्ये तापमानात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात परभणी, हिंगोली, वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. हिंगोली जिल्ह्यातील तापमानात प्रचंड घट झाली आहे. परिणामी जिल्हाभरात थंडीची लाट पसरली आहे. . परभणी जिल्ह्यातील तापमान 10 अंशापर्यंत खाली आहे. त्यामुळे नागरिक ठिकठिकाणी शेकोटी पेटवून उब घेताना दिसत आहेत. वाशिममध्येही गेल्या काही आठवड्यापासून गायब झालेल्या थंडीने परत जोर धरला आहे. वाशिम जिल्ह्यात 14℃ पर्यंत पारा खाली घसरला आहे.
Comments
Add Comment