मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर या दोघी ज्या पार्टीत सहभागी झाल्या होत्या त्या पार्टीमध्ये अभिनेत्री आलिया भट देखील सहभागी होती. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने तीला होम क्वारंटाईन केले असताना नियम तोडून तिने दिल्ली प्रवास केला आहे. या प्रकरणी आलियावर कारवाई करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. या प्रकरणी काहीतरी निर्णय पालिकेने घ्यावा, अशी मागणी आरोग्य समिती अध्यक्षा राजूल पटेल यांनी प्रशासनाला केली आहे.
बॉलिवूडच्या एका पार्टीत या अभिनेत्री सहभाही झाल्या होत्या. या पार्टीत सहभागी झालेल्या अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच याच पार्टीत सहभागी असलेली आलिया भट एका हाय रिस्क कोविड १९ संसर्ग बाधीत रुग्णाच्या संपर्कात आली असल्यामुळे तिला होम क्वारंटाईन राहण्याचे बंधन पालिकेने घातले होते. मात्र असे असतानाही आलिया भट्टने पालिकेच्या नियमांचे उल्लंघन करत शुटींगसाठी दिल्ली प्रवास केला. मात्र असे असूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे तिच्यावर कारवाईबाबत काहितरी निर्णय घ्या अशी मागणी आरोग्य समिती अध्यक्षांनी केली आहे.