३७ गुंतवणूकदारांना सव्वा पाच कोटी रुपयांना गंडा

  67

उल्हासनगर (वार्ताहर) : सदगुरु डेव्हलपर्स ह्या बांधकाम व्यावसायिक कंपनीत गुंतवणूक केलेल्या ३७ गुंतवणूकदारांच्या तोंडाला पाने पुसत तब्बल सव्वा पाच कोटी रुपयांना गंडा घातल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाअंती मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपींना अटक करण्यात आली नसून त्यांच्यापासून आमच्या जिवाला धोका असल्याचे गुंतवणूकदारांनी सांगितले.

कल्याणमध्ये राहणारे किशोर दादलानी यांचा बेकरीचा व्यवसाय असून उल्हासनगरमध्ये कार्यालय आहे. दादलानी यांच्या ओळखीचे गोविंद मनचंदा आणि ओम मनचंदा ह्या दलालांनी संपर्क साधला. त्यांना बांधकाम व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून कल्याण आणि उल्हासनगर भागात नव्याने सुरू होत असलेल्या इमारतीमध्ये कमी रक्कमेत दुकाने, घरे अथवा जादा रक्कम परत देण्याचे सांगितले. यावर विश्वास ठेवून ३८ जणांनी वेळोवेळी एकूण ५ कोटी ५४ लाख रुपयांचे आठ बांधकाम विकासकांच्या कार्यालयात धनादेश दिले होते. काही महिने गुंतवणूकदारांना परतावाही देण्यात आला. त्यानंतर गुंतवणूकदार परतावा मागण्यासाठी २०१९ ला गेले असता त्या आठही जण गुंतवणूकदारांना दिलेल्या रक्कमेचा परतावा न करताच ठरलेली रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होते. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली
Comments
Add Comment

Sanjay Shirsath : पैशांनी भरलेली बॅग, हातात सिगारेट, संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडीओने खळबळ

मुंबई : महायुतीचे मंत्री संजय शिरसाट यांच्या एका व्हायरल व्हिडिओने सगळीकडेच खळबळ माजली आहे. नुकतीच मंत्री संजय

मुंबईत बेस्ट बसेसची संख्या १० हजारांपर्यंत वाढवण्याची योजना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभागृहात माहिती

मुंबई : मुंबईच्या बेस्ट उपक्रमामध्ये भाडेतत्वावर ६,५५५ बसेस घेण्यासाठी विविध पुरवठादारांसोबत करार केला आहे.

Medical College : 'अहिल्यानगर शहरातच वैद्यकीय महाविद्यालय होणार'; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

अहिल्यानगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातचं होणार असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं

Nitesh Rane : ‘मुंबईचा डीएनए हिंदूंचा, महानगरपालिकेत फक्त भगवे बसणार…’, नितेश राणे यांचा ठाम विश्वास

मुंबई : नितेश राणे यांच्या हस्ते ‘बोरीवली रो-रो जेट्टी (फेज १)’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन आज सकाळी

आता वेळेत पूर्ण होणार मुंबई मेट्रोची कामे

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्पांचा विस्तार झपाट्याने सुरू आहे. एमएमआरडीए हणजेच मुंबई महानगर

गोठवलेल्या बँक खात्यांतील पैसे खातेदारांना लवकर मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी) : सायबर गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित करण्यात